महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचे असेल तर…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 March :- शरद पवार आणि अजित पवार यांना नाशिकपासून पुण्यापर्यंत रेल्वे मार्ग हवा आहे. त्यासाठी मी तयार आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही सरकारचा 50-50 टक्क्यांचा शेअरिंग हवा. या कामासाठी राज्य सरकार 70 टक्के शेअर देत आहे तर समृद्धी महामार्गाला का देत नाही? असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जालन्यात एका सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवे बोलत होते.

पुढे रावसाहेब दानवे म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले आहे. ठेवणारच आता. आम्ही या मार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. गोष्ट चांगली आहे. माझी उद्धव साहेबांची भेट झाली. त्यावेळी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देत आहात तर 50 टक्के पैसे तुम्ही द्या, 50 टक्के पैसे आम्ही देतो. मुंबईपासून ते नागपूरपर्यंतचा रस्ता आपण करू, असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच समृद्धी महामार्ग झाल्यावर तुमचे-आमचे सर्वांचे नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे दानवे म्हणाले की, अनेकांची रेल्वेबाबतची अनेक स्वप्नं आहेत. औरंगाबादपासून पुण्यापर्यंत रेल्वेमार्ग झाला पाहिजे. औरंगाबादपासून नगरपर्यंत झाला पाहिजे. चाळीसगावपर्यंत झाला पाहिजे. हे सर्वे रेल्वेने केले नाही. महाराष्ट्राच्या महारेलने केलेले आहेत. त्यांच्याशी बैठक झाली तर आपण राज्य सरकारला आग्रह धरू. आम्हाला कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे टक्के 50 पैसे द्या अशी मागणी सरकारकडून करू. त्यानंतर रेल्वेचा मार्ग कुठून कसा असेल याचे प्राधान्य ठरवा. थांबा कुठून कुठपर्यंत करायचा हेही ठरवा. असे देखील दानवे म्हणाले.