महाराष्ट्र

फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही, एवढा दंगा कशासाठी?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 March :- सायबर पोलिस ठाण्यात फडणवीसांना आधी बोलाविले नव्हते. त्यांना फक्त प्रश्नांवली पाठविली होती. त्यावर त्यांचे उत्तर आले नाही. एक वेळ नव्हे त्यांना पाच ते सहा वेळा नोटीस पाठविली. नोटीस दिल्यानंतर एवढा दंगा कशासाठी, आरोपी म्हणुन त्यांना नोटीस पाठविली नाही.

एक वर्ष जुनी केस आहे. त्यात फडणवीसांच्या जबाबाविना हा तपास थांबलेला होता. त्यामुळे त्यांचा जबाब घेणे आवश्यक होता अशा शब्दात फडणवीसांना प्राप्त झालेल्या नोटीस प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खोचक वक्तव्य केले.

एसआयटीच्या कार्यालयातून गोपनिय कागदपत्रे व तांत्रिक माहिती अज्ञात व्यक्तीने बेकायदेशिररित्या मिळविले. या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच गोपनिय माहिती लिक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला. त्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात आली असे त्यांनी सांगितले.

नमुद तारखेवेळी राज्य गुप्त वार्ता विभागातील माहिती बेकायदेशिररित्या मिळवली गेली. यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. २४ साक्षीदाराचे जबाब नोंदविले. गुन्ह्याशी संबंधित लोकांचा जबाब घेणे सुरु आहे. त्यात फडणवीस यांचाही जबाब घेणे बाकी होते. त्यांना पाच ते सहा वेळा नोटीस दिल्या. नोटीस पाठविणे हे समन्स नाही. माहिती द्यायची की नाही हा त्यांचा अधिकार आहे असेही ते म्हणाले.