बीड

साक्षीदाराप्रमाणे नव्हे तर आरोपीप्रमाणे होते पोलिसांचे प्रश्न…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 March :- महाघोटाळ्याची माहिती मी सरकारला दिली असती तर त्यांनी काहीही दिवे लावले नसते. त्यांनी हा महाघोटाळा दाबला असता. पोलिसांनी आज केलेल्या चौकशीतील प्रश्न साक्षीदाराप्रमाणे नव्हे तर आरोपीप्रमाणे होते. राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई होत असून अधिकाऱ्यांवर दबाब टाकला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यात​​​​​​ मुंबई सायबर पोलिसांकडून आज चौकशी झाली. सुमारे दोन तास ही चौकशी करण्यात आली. त्यानंतर फडणवीसांनी परिषद घेतली.

माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला. या बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती मी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली. या विषयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. यात सीबीआय चौकशी करीत आहे. महाघोटाळा का घडला याची सरकार चौकशी करू शकत नाही. महाघोटाळा अहवाल सरकारने सहा महिणे दाबून ठेवला. मी तो बाहेर काढला नसता तर घोटाळा दबला गेला असता. मला अचानक नोटीस पाठविण्याचे कारण सभागृहात मी केलेले आरोप व सरकारचे दाऊदशी असलेले संबंध हे आहे.

मला विचारलेले प्रश्न व प्रश्नावली यात मोठी विसंगती होती. जणु मी गोपनीयता कायद्याचा भंग केला असाच पोलिसांचा माझ्यावर रोख होता. साक्षादारांचा जबाब घेतात तसे प्रश्न नव्हते याउलट आरोपी व सहआरोपी केले जाईल अशा पद्धतीचे प्रश्न होते. गोपनीय माहिती उघड केल्याचा नव्हे तर व्हीसल ब्लोअर प्रोटेक्शन कायदा माझ्यावर लागू व्हावा हेच मी पाोलिसांना सांगितले.

फडणवीसांना विचारले हे प्रश्न
रश्मी शुक्लांनी केलेल्या फोन टॅपिंगची तुम्हाला माहिती होती का?
सभागृहात मांडलेला गोपनिय अहवालातील माहिती आपल्याकडे कुठुन आले?
केंद्रीय गृहमंत्रालयाला आपण डाटा दिला त्यात नेमके काय आहे?
रश्मी शुक्ला एसआयटी प्रमुख होत्या, तेव्हा गोपनिय माहितीत ज्या पुराव्यांचा उल्लेख केला ते आपल्याकडे कुठुन आले?