सिनेमा,मनोरंजन

लग्नाचा मुहुर्त सापडला…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 March :- ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या व्यतिरिक्त आलिया आपला बॉयफ्रेंड रणवीर कपूरमुळे देखील चर्चेत असताना पाहायला मिळत आहे. रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

अखेर दोघांना लग्नाचा मुहुर्त सापडला असून, त्यांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. हे दोघे जोडपे ऑक्टोबर 2022 या महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र आलिया आणि रणवीरकडून लग्नाची कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही.

आलिया आणि रणवीर मागील वर्षातच विवाहबंधनात अडकणार होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. तेव्हापासून आलिया आणि रणवीरच्या लग्नाच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याचे लग्न पुढे ढकलल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये आलिया आणि रणवीर लग्न करणार अशी माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि आलिया ऑक्टोबरमध्येच लग्न करणार असल्याचे समजते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख मागे-पुढे ढकलण्यात येत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबियांनी आलिया-रणवीरचे लग्न ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे सांगितले. कुटुंबियांचे म्हणणे आहे की, पाली हिल येथे नव्या बंगल्याचे बांधकाम सुरू असून, त्याचे काम पूर्ण झाल्यावरच या जोडप्याचे लग्न होणार आहे. कारण लग्नानंतर आलिया आणि रणवीर नव्या घरात राहायला जाणार आहेत.