लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
12 March :- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. शारिरीक संबंधामूळे तरुणी गरोदर असल्याचे तिच्या मेडिकल रिपोर्टमध्ये दिसून आले आहे. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान ह्या सगळ्या प्रकारानंतर डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयन्त या तरुणीने केला. काही दिवसांपूर्वी पीडित 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला होता. तरुणीने दिलेल्या फिर्य़ादीनूसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते.
या संबंधातून पीडित तरुणी गरोदर राहिली. त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीने तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले. झालेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला लागतील अशीही धमकी तरुणीला देण्यात आली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.