पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेल्या कामाला मुख्यमंत्री ठाकरेंनी लावला ब्रेक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
12 March :- पाच राज्यातील निवडणुकानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आणि यात भर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या कामाला ब्रेक लावला आहे. नदीकाठ सुधार योजनेच्या प्रकल्पावरून आता राज्यातील राजकीय वातावरण पेटणार असे दिसून येत आहे. पुण्यात 6 मार्चला नदी सुधार योजनेचे भू्मिपूजन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. या प्रकल्पावरील विविध आक्षेपांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून या प्रकल्पावर असणाऱ्या आक्षेपांबाबत एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीद्वारे येत्या आठ ते दहा दिवसात अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे शरद पवारांशी चर्चा करणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. भाजपची पुणे मनपात सत्ता असल्याने ठाकरे सरकाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुख्यत: या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री हजर असताना प्रकल्पाला ब्रेक लावल्याने मविआत सर्व अलबेल आहे का ? नाही असा प्रश्न राजकीय जाणकरांना पडला आहे. पुण्यातील नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारकडून ब्रेक लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यातच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. आता ठाकरे सरकार नदीकाठ सुधार योजनेवरील आक्षेप, योजनेतील कामे, परिणाम या बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार आहे. यासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण खात्यातील सचिवांची समिती नेमण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू आहे. आगामी निवडणूक अवघड जाऊ नये, यासाठी तर हे सगळं सुरू नाहीये ना. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.तर प्रकल्पाच्या अहवालानंतर मुख्यमंत्री शरद पवारांची भेट घेणार असल्याने यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.