महाराष्ट्र

राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 March :- राज्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आज विधानसभेच्या बजेट सत्रात राज्याचे बजेट सादर करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत 2022-23 चे राज्याचे बजेट सादर केले. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या सर्वांचा सर्वसामान्यांवर देखील परिणाम होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. या इंधनावरील करात कपात होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली होती. परंतु अर्थसंकल्पात त्यावर कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

नोव्हेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरी उत्पादन शुल्क कमी केले होते. या गोष्टीला आता तीन महिने झाले आहे. तरी देखील राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करण्याविषयी कोणताही निर्णय घेतलाला नाही. दरम्यान राज्यातील एकूण उत्पन्नामध्ये कोव्हिड काळाच्या तुलनेत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील ही वाढ वापरुन इंधनावरील कर कमी करुन अजित पवार जनतेला दिलासा देतील अशी अपेक्षा होती. मात्र आज पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धीत करात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल चढ्या दराने खरेदी करावे लागणार आहे. यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.

अर्थमंत्री अजित पवारांनी नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, याचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी मूल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के एवढा केला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर जवळपास 800 कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे. अजित पवारांच्या या घोषणेमुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30 हजारांपेक्षा अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासोबतच मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करारातून 189000 हजार कोटी रूपये गुंतवणूक करून रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्य बेरोजगार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.