महाराष्ट्र

कळसूत्री सरकारने पंचसूत्री मांडली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 March :- महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाने तोंडाला पानं पुसली. कळसूत्री सरकारने पंचसूत्री मांडली आहे. विकासाच्या पंचसूत्रीने काहीही होणार नाही. अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडली, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, चालू कामाच्या घोषणा या बजेटमध्ये करण्यात आल्या. राज्याचे हे बजेट दिशाहीन आहे. आमच्या काळातील योजना पुन्हा नव्याने अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या. विदर्भ आणि मराठवाड्यावर या बजेटने अन्याय केला आहे, असे म्हणत आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली.

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणेवर ते म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? महाविकास आघाडी सरकारमुळे विमा कंपन्यांचा अधिक फायदा होत असून, सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. सरकार कशामुळे आपली पाठ थोपटून घेतल आहे कळत नाही. पेट्रोलवरील कर कमी केला नाही. मराठवाड्यावर यावेळी अन्याय झाला आहे. मराठवाडा ग्रीडला एकही नवा रुपया मिळाला नाही. मराठवाड्याच्या ग्रीड प्रकल्पाचा सरकारने खून केला आहे, असे म्हणत फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या बजेटवर निराशा व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रासाठीही नव्या योजना नाहीत. केंद्राच्या योजनाच राज्य सरकारने आज वाचल्या. सामान्य माणसाची या बजेटने निराशा केली आहे. एसटी कामगारांची देखील मागणी सरकारने फेटाळली आहे. सरकारने एसटीला दिलेली जुनी मदत दाखवली. हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू नका असे कोर्टाने म्हटले आहे. एसटी संपावर पुढील सुनावणी 22 मार्चला होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.