भारत

योगींनी गुलालाची उधळण, म्हणाले- मोदींसारखा नेता असल्यावर असे प्रचंड बहुमत मिळते

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 March :- उत्तर प्रदेशने पुन्हा एकदा मोदी-योगींच्या डबल इंजिनवर धावण्याचा निर्णय घेतला आहे. 260 हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा विजय निश्चित झाला आहे. योगी आदित्यनाथ भाजपच्या लखनऊ कार्यालयात पोहोचले. त्यांनी येथे गुलालाची जोरदार उधळण केली.

योगी म्हणाले, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या नजरा विशेषतः उत्तर प्रदेशकडे लागल्या होत्या. आज उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि भाजपच्या मित्रपक्षांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार. बंधू आणि भगिनींनो, 7 टप्प्यांत पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मतमोजणीचा भ्रामक प्रचार सुरू होता. उत्तर प्रदेशातील जनतेच्या शक्तीने त्या भ्रामक प्रचाराचा धुव्वा उडवला आणि भाजपला विजयी केले.

उत्तर प्रदेशात सुशासनासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला पंतप्रधानांचे सहकार्य आणि दिशा मिळाली आहे. आज सर्वांच्या सहकार्याने भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे आणि देशातील सर्वात मोठ्या राज्यात मिळाले आहे. हे बहुमत म्हणजे भाजपच्या राष्ट्रवाद, विकास आणि सुशासनाच्या मॉडेलला उत्तर प्रदेशातील जनतेचा आशीर्वाद आहे. सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास – सबका प्रयासाने आम्ही पुढे जाऊ.

कोरोनाच्या काळातही पंतप्रधानांचे न थांबता आणि अथक मार्गदर्शन मिळत राहिले. कोरोनाच्या काळातही हजारो लोकांना त्यांच्या घरी रेशन पाठवण्यात आले. जेव्हा आपण कोरोना आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढत होतो, तेव्हा काही लोक भाजपविरोधात कटकारस्थान करत होते. आज जनतेने जनादेशातून सर्वांना धडा शिकवला आहे. राष्ट्रवाद, सुरक्षा, विकास आणि सुशासन या मुद्द्यावर भाजपला बहुमत मिळाले आहे. आम्हाला यावर खरे उतरावे लागेल, ही जबाबदारी आमच्यावर आली आहे. मोदींसारखा नेता असला की एवढं प्रचंड बहुमत मिळतं. मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात उत्तर प्रदेश पुन्हा एकदा नंबर वन बनेल.