महाराष्ट्र

फडणवीसांचा घणाघात! हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 March :- नवाब मलिकांविरोधात एकवटलो. देशद्रोह्यांच्या विरोधात देशभक्तांचा, भारत मातेच्या सुपुत्रांचा हा संघर्ष आहे. ज्या लोकांनी मुंबईत निष्पाप जीवांना बाँम्बस्फोटात कट रचून मारले त्यांच्याशी व्यवहार करताना मलिकांना लाज वाटायला हवी. मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आज मोर्चा काढला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नैतृत्वात आझाद मैदानापासून मोर्चा निघाला असून मेट्रो थिएटरपर्यंत हा मोर्चा धडकणार आहे. आझाद मैदानावर नवाब मलिकांविरोधात भाजप नेते, कार्यकर्ते एकवटले. मोर्चात भारत माता की जय, नवाब मलिक राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजीही यावेळी देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी हाती फलक व भाजपचे झेंडे घेत मार्गक्रमण केले. भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

तत्पुर्वी मोर्चाला संबोधित करताना फडणवीस यांनी नवाब मलिक व राज्यसरकारवर हल्ला चढविला. आपल्या खास शैलीत ते म्हणाले, नवाब मलिकांचा राजीनामा आम्ही राजकारणासाठी घेण्याचे बोलत नाही. त्यांचे दहशतवाद्यांशी संपर्क आहे. रोज घटना घडतात, पण रोज आम्ही राजीनामे मागत नाही. पण हा मुद्दा गंभीर आहे. बाँम्बस्फोटातील आरोपींशी मलिकांचा संबंध आहे.

सलिम पटेल मुंबई बाँम्बस्फोटात सहभागी असून हसीना पारकर दाऊदची बहिण आहे. तिच्या नावाने रियल इस्टेट व्यवसाय दाऊद चालवितो. त्यातून अमाप पैसा कमावुन तो देशविघातक कृत्यासाठी वापरत आहे. नवाब मलिकांना लाज का वाटली नाही ज्या जमीनीचा व्यवहार केला त्यातील कागदपत्रांवर पहिला फोटो सलिम पटेल दुसरा फोटो हसीना पारकर यांचा होता, तिसरा फोटो नवाब मलिकांच्या मुलांचा आहे.

२५ रुपये प्रति चौरस फुटाने जमीन विकत घेतली. पैशांसाठी एवढे आंधळे का झालात असा घाणाघात नवाब मलिक यांच्यावर करीत ज्यांच्यांशी मलिकांनी व्यवहार केला त्या लोकांनी मुंबईत निष्पाप जीवांना बाँम्बस्फोटात कट रचून मारले. त्यांच्याशी व्यवहार करताना शरम वाटायला हवी होती.