महाराष्ट्र

फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 March :- मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यासाठी भाजपने आज मुंबईच्या आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. भाजपच्या या मोर्चात महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी फडणवीस यांना गाडीत टाकून नेले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांसोबत जमिनीचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार मलिकांना वाचवण्याचे प्रयत्न का करत आहे? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने काढलेल्या धडक मोर्चामध्ये मुंबई, ठाण्यातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

राज्य सरकारने मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचा धडक मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो थिएटर असा काढण्यात आला. मोठ्या संख्येने भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आझाद मैदानात जमले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात पोहोचल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे यांना ताब्यात घेतले.