नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
7 March :- ईडीच्या ताब्यात असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मुंबईतील विशेष ईडी न्यायालयात आज (ता. ७) हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन मलिक यांना २१ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ईडीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य केली. यादरम्यान घरचे जेवण मिळावे यासाठी ईडी न्यायालयात नवाब मलिक यांनी अर्ज केला आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरने चौकशी दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे नाव घेतले होते. त्यानंतर ईडीकडून त्यांची चौकशी झाल्यानंतर अटक करण्यात आली.
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने ही कारवाई केली होती