क्रीडा

श्रीलंकेविरुद्ध कसोटीत भारताचा 222 धावांनी विजय

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 March :- रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने मोहाली येथील पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

फॉलोऑन खेळण्यास भाग पाडल्यामुळे श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 178 धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 574/8 (घोषित) धावसंख्या केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांत आटोपला.

जडेजाने या कसोटी सामन्यात 175 धावांची नाबाद खेळी करत श्रीलंकेच्या पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने कसोटीत 7 बळी घेतले. तो आता कपिल देवला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2017 मध्ये नागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला होता.