महाराष्ट्र

राजकारण करण्याची ही वेळ नाही, भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप देशात आणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 March :- युक्रेनमध्ये भारतीय विदयार्थ्यांचे हाल सूरू आहेत. संकटात लढणाऱ्यांना ताकद द्यायला हवी. राज्य संकटात असताना घरी बसणं जमत नाही. युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रवेश घेणं कठीण जात आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. विद्यार्थ्यांसाठी मदत करायला हवी. त्यांना देशात सुखरूप आणायला हवे असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे येथे केले.

माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जातात. युक्रेनमधील स्थिती गंभीर आहे. तेथील लोकही देशाच्या व्यवस्थापनाबाबत नाराज आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना देशात प्रवेश घेणे कठीण होत आहे. त्यांची मदत करायला हवी. संकटात कोणी काय केले त्याचे मोजमाप करायला नको.

सर्वांन एकत्र येऊन संकट निवारायला हवे. ठोस कृती करायला हवी. युक्रेनमध्ये अजूनहीबरेच विद्यार्थी आहेत. ही राजकारण करण्याची वेळ नाही. भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढा. देश महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला.