पीएम मोदी उद्या पुणे दौऱ्यावर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 March :- पुणे मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 6 मार्च रोजी पुण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पुणे पालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांसाठी विशेष पगडीदेखील तयार करण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोल यांच्यातर्फे पंतप्रधानांना ही पगडी घातली जाणार आहे.
पुण्यातीलच गिरीश मुरूडकर यांनी ही पगडी तयार केली आहे. ही पगडी आता पुर्णपणे तयार झाली असून तिचे चित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यामुळे या पगडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातील मेट्रो सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही आंमत्रित करण्यात आले आहे. तसेच, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजला जातो. मात्र, सध्या महाविकास आघाडी व भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडातील हे तिन्ही नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार का, हे पाहणे औत्सुक्त्याचे ठरणार आहे.