महाराष्ट्र

सिंधुदुर्गा मध्येही जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग-जिल्ह्यात रात्रभर मान्सून पूर्व पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.