बीडच्या कलेक्टर ऑफिसमध्ये शोले स्टाईल आंदोलन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 March :- शोले स्टाईल आंदोलन केल्याने वृक्षतोड करणाऱ्या बीडमध्ये जिल्हा प्रशासनाला, पुन्हा एकदा आंदोलन कर्त्यांनी आव्हान दिलंय. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने, चक्क बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिंबाच्या झाडवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. प्रकाश वाघमारे असं शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या आंदोलकाचे नाव आहे.
मोची पिंपळगाव येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाप्रकरणी कारवाई करावी, या मागणीसाठी प्रकाश वाघमारे यांचं गेल्या 6 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणाची दखल न घेतल्याने, प्रकाश वाघमारे यांनी आक्रमक पवित्रा घेत, चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमधील लिंबाच्या झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. तर जोपर्यंत मागणीवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही. असा पवित्रा शोले स्टाईल आंदोलनकर्त्यांनी घेतलाय.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर रोडवरील, 50 वर्षांपूर्वीच्या लिंबाच्या झाडावर, शोले स्टाईल आंदोलन होत आहेत. त्यामुळं एखादी दुर्घटना होऊ शकते, असं कारण देत एक नव्हे तर तीन झाडं तोडण्यात आली. मात्र आता चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या लिंबाच्या झाडावरचं शोले स्टाईल आंदोलन सुरू केल्याने, प्रशासन आता हे देखील झाडं तोडणार का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केलाय.