देशाचे रक्षण करण्यासाठी 50 हजार युक्रेनियनची मायदेशी धाव
3 March :– युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले सलग आठव्या दिवशीही सुरूच आहेत. राजधानी कीव्ह व्यतिरिक्त रशियन सैन्य खार्किवसह काही प्रमुख शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागत आहे. दरम्यान, उत्तर कीव्हपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या चेर्निहिव्ह, सुकाची, बुका या शहरांचे उपग्रह फोटोज समोर आले आहेत, ज्यामध्ये विध्वंस दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. हे फोटो अमेरिकेच्या मॅक्सार टेक्नॉलॉजीजने जारी केली आहे.
‘न्यूयॉर्क टाईम्स’नुसार, इतर देशांमध्ये राहणारे सुमारे 50 हजार युक्रेनियन मायदेशी परतले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी आतापासून कोणत्याही क्षणी पोलंड-बेलारूस सीमेवर सुरू होईल. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले – आम्हाला आशा आहे की चर्चा निष्कर्षापर्यंत पोहोचेल. दरम्यान, दोन तासांच्या शांततेनंतर रशियन सैन्याने कीववर पुन्हा हल्ले तीव्र केले आहेत.