बीड

बीड- मांजरसुंबा रोडवर भीषण अपघात; ३ ठार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 March :- औरंगाबाद कडून लातूरकडे जात असलेल्या भरधाव बसने दिलेल्या धडकेत बुलेटवरील तिघे ठार झाले. हा अपघात बुधवार दी.2 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास बीड शहरापासुन जवळच असलेल्या खजाना विहीर जवळ बीड- मांजरसुंबा रोडवर पाली परिसरात झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठान्याचे पोलिस निरिक्षक साबळे, पोलिस कर्मचारी आनंद म्हस्के, सानप, बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

कृष्णा भारत शेळके (वय २३, रा. दगडी शहाजानपूर, ता.बीड), पारसनाथ मनोहर रोहिटे (वय २२, रा. आहेरवडगाव ता. बीड) आणि अक्षय सुरेश मुळे (वय २२, रा. घोडकाराजुरी, ता.बीड) अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिघे तरुण बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास बुलेटवरुन (एमएच २३ एल ७२२७) आहेरवडगाव (ता.बीड) येथून बीड शहराकडे येत होते. यावेळी धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या औरंगाबाद लातूर भरधाव आलेल्या बसने (एमएच १४ बीटी २४५५) जोराची धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की, डोक्याला जबर मार लागल्याने यामध्ये पारसनाथ व कृष्णा जागीच ठार झाले तर रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमी अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली होती. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोह. प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, पोशि. रवि सानप व चालक कृष्णात बडे यांनी धाव घेतली. सदरील बस पोलीस मुख्यालयात लावण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.