युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 March :- रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या सहाव्या दिवशी खार्किव शहरात नवीन या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर सांगितले- कळवताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे की, खार्किव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी नवीन हा कर्नाटकचा रहिवासी होता. तो 21 वर्षांचा होता आणि जेवण घेण्यासाठी बाहेर गेला होता. तो युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता.
रशियाने युक्रेनविरोधातील युद्धात प्रतिबंधित केलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओकसाना मार्कारोव्हा यांनी हा दावा केला. व्हॅक्युम बॉम्ब सह इतरही प्रतिबंधित शस्त्रांचा वापर रशिया करत असल्याचा युक्रेनमधील मानवी हक्क संघटनांचा आणि युक्रेन सैन्याचा दावा आहे.
बागची म्हणाले- युक्रेनमधील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांच्या संपर्कात आहेत. नागरिकांचे त्वरित आणि सुरक्षित परतणे हे आमचे प्राधान्य आहे. रशिया आणि युक्रेनमधील आमचे राजदूत तेच करत आहेत.
येथे, रशियाने कीव्ह, खार्किव आणि चेर्निहाइव्हमध्ये तोळफखाना (तोफांनी) हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना तात्का कीव्ह सोडण्यास सांगितले आहे. दूतावासाने जारी केलेल्या आपत्कालीन सल्लागारात असे म्हटले आहे – भारतीयांनी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्वरित शहर सोडावे.