बीड

राजकारण बाजूला ठेवून ऊस गाळप करण्याचे नियोजन करावे – धनंजय मुंडेंच्या सूचना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Feb :- राजकारण साधायला आगामी निवडणुका समोर आहेत, तिथे राजकारण करता येईल मात्र शेतकरी संकटात असताना ऊस गाळपावरून सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी राजकारण करू नये, सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जाईल, असे नियोजन साखर आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासन व साखर कारखान्यांनी मिळून करावे अशा सूचना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील अधिक ऊस क्षेत्र असलेल्या उसाचे नियोजन करण्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, ट्वेन्टी-ट्वेन्टी साखर कारखाना सायखेडा, अंबासाखर सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी शुगर्स, जय महेश साखर कारखाना माजलगाव यांच्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी तसेच साखर आयुक्त कार्यालय व जिल्हा प्रशासन यांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक घेत सूचना दिल्या आहेत.