जनतेने वीजबिल भरावे; अन्यथा कनेक्शन कापण्यात येईल- उर्जामंत्र्यांचा इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
28 Feb :- राज्य सरकार वीजबिल माफ करेल अशी आशा अनेकांनी लावून धरली आहे. त्यामूळे अनेक जण वीजबिल भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल भरण्यावर भाष्य केले आहे. “राज्य सरकार वीजबिल माफ करणार नाही. त्यामूळे ज्यांनी वीजेचे बिल भरले नसेल त्यांनी लवकरात लवकर भरुन घ्यावे. अन्यथा कनेक्शन कापण्यात येईल” असा थेट इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, राज्यात कुणालाही वीज फुकटात भेटणार नाही. त्यामूळे ज्यांच्याकडे वीजबिलाची थकबाकी आहे. त्यांनी लवकरात-लवकर बिल भरुन प्रशासनाला सहकार्य करावे. असे राऊत म्हणाले. जर वेळेवर वीजबिल चुकवले नाही, तर वीजेचे कनेक्शन कापण्यात येतील. असे राऊत म्हणाले.
पुढे नितीन राऊत म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही 24 तास विद्यूत पुरवठा केला. पुढे ते म्हणाले की, कोरोनात सर्वजण घरी होते. मात्र आमचे कर्मचारी जीवाची काळजी न करता, सेवेवर तैनात होते. त्यांच्यामूळे जनतेला 24 तास वीजपुरवठा केला गेला. त्यामुळे कोरोना काळात लोकांनी घरी बसुन, टीव्ही, लॅपटॉप, कुलर, फ्रिज यांचे आनंद लुटले. हे केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांमुळेच शक्य झाले. राज्यात कोरोनाचे संकट असतानाही आमचे कर्मचारी दिवसरात्रं कामावर रुजू होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव देखील गमवावा लागला.
रविवारी मुंबईच्या अनेक भागात अचानक वीजपूरवठा खंडीत झाला होता. त्याचा परिमाण थेट मुंबईची लाईफलाईन लोकलवर पाहायला मिळाला. पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे अंधेरी ते चर्चगेट या भागात लोकलवर काहीसा परिणाम झाला होता. वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या 70 मिनीटांनी पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.