उच्च न्यायालयाची सोनिया गांधी, राहुल गांधी नोटीस
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
28 Feb :- काँग्रेसचे अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि खासदार राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी नोटीस पाठवली आहे. उच्च न्यायालयाने या तिघांसह आणखी काही नेत्यांना देखील नोटीस पाठवली आहे. ही नोटीस उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगली प्रकरणी आहे. नोटीसीमध्ये न्यायालयाने पक्षकार म्हणून त्यांच्यावर खटला का चालवू नये, अशी विचारणा केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, केंद्रीय मंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते अनुराग ठाकूर, अभिनेत्री कलाकार स्वरा भास्कर आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना नोटीस पाठवली आहे. हायकोर्टाने पाठवलेल्या नोटीसमध्ये, या सर्व नेत्यांकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात दिल्ली दंगलीच्या प्रकरणांमध्ये पक्षकार म्हणून खटला का चालवला जाऊ नये, याची उत्तरे मागितली आहेत.
जस्टिस सिद्धार्थ मृदुल आणि जस्टिस अनूप कुमार मेंदीरत्ता यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या याचिकेवर सुमारे 25 जणांना नोटीस पाठवली आहे. त्यात भाजप नेते कपिल मिश्रा, भाजप खासदार प्रवेश वर्मा, आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान, वारिस पठाण, महमूद पार्चा आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांचा समावेश आहे. या सर्व जणांवर दंगली भडकवण्याप्रकरणी भाष्य केल्याचा आरोप आहे.