बीड

बीड- मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Feb :- बीड शहरातील हिरो या मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग लागली आहे. आज रविवारचा दिवस असल्याने सुदैवाने यामध्ये कर्मचारी कार्यरत नव्हते, मात्र आगीची माहिती मिळताच मालकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अखेर बीड अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत लाखोंच्या नवीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. आग एवढी भीषण असून गोदामा सह शोरूम मध्ये देखील पसरली आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.