झोपेत असताना तलवारीने सपासप वार केले आणि झाले फरार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 Feb :- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये जुन्या भांडणाची कुरापत काडून शनिवारी रात्री १ च्या सुमारास झोपेत असताना तलवारीने सपासप वार केल्याने एक गंभीर तर एकाची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी औरंगाबाद या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की श्रीदेवी येथील दोन कुटुंबात गेल्या काही वर्षापासून जमिनीचा वाद सुरू असून या वादामुळे मागील वर्षी गुन्हा घडला होता त्याचाच राग मनात धरणी पुना शनिवार रात्री झोपेत असताना हल्ला शेख समीर शेख अमीन हा आपल्या शेतात झोपलेला असताना रात्री एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ ,शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे आले व त्यांनी समीर यांच्यावर झोपेत असताना तलवारीने मानेवर, पायावर, पोटावर, हातावर सपासप वार करून फरार झाले आहेत .
या घटनेमध्ये समीर च्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद या मुलावर सुध्दा गुढग्यावर वार झाले आहेत ही घटना रात्री सिरसदेवी येथील बेंडकी या ठिकाणी घडली असून शेजारी राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्यानंतर समीर यांच्याकडे धावत जाऊन समीर हा जखमी अवस्थेत असल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्याची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने शेख समीर याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी तलवाडा पोलीस जखमीच्या चौकशीसाठी औरंगाबाद या ठिकाणी गेलेले असून बीट अमलदार तोंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की डॉक्टर ने काही वेळानंतर चौकशी करा तोपर्यंत सदर जखमी शी कसल्याही प्रकारे विचारपूस करू नका असे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणी तलवाडा पोलीस पुढील तपास करत आहेत .