भारत

कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Feb :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या आणि 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय मलिक यांना पोटदुखीमुळे रात्रभर झोप लागली नाही, त्यानंतर आज सकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना दाखल करण्यात आले.

सध्या, ईडी किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा निषेध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून होत आहे.

कुर्ला जमीन व्यवहारात नवाब मलिक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे, त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. अटकेपासून ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांच्या कुटुंबावरही ईडीने आपली पकड घट्ट करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी आज नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांनी दाऊदची बहीण हसिना पारकरकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराज मलिकांचाही या व्यवहारात सहभाग होता.