बीड

खळबळजनक! बीडमध्ये गोळीबार; 2 जण जखमी

25 Feb :- बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात आज दि 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सतीश क्षीरसागर आणि फारूक सिद्दीकी अशी जखमींची नावे आहेत. सतीश क्षीरसागर यास पायाला गोळी लागली आहे तर फारूक सिद्दीकीच्या पायाला गोळी चाटून गेली आहे. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाला असल्याचे कारण समोर आले आहे.