युक्रेन-रशिया वादावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
22 Feb :- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका जनसभेला संबोधित केले. मोदी म्हणाले संपूर्ण जगात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रशिया-युक्रेनसारख्या देशात युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने अधिक शक्तिशाली आणि बलाढ्य होणे आवश्यक आहे. भारताचे शक्तिशाली असणे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, तुमचा एक-एक मत भारताला शक्तिशाली बनवेस. सोहेलदेवचे नागरिक आपल्या मताने देशाला अधिक शक्तिशाली आणि बलाढ्य करतील. असे मोदी म्हणाले. पुढे मोदींनी एका शिक्षकाचे उदाहरण देत म्हटले आहे की, शाळेत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ढीले गुरुजी आवडतात का? प्रत्येकाला एक चांगले गुरुजी व्हायचे आहे. पुढे मोदी म्हणाले की, कठीण काळातही कणखर नेता असणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यापासून इथपर्यंतचा प्रवास आम्ही सर्व प्रकारच्या संघर्षातून केला आहे.
समृद्ध भारतासाठी उत्तर प्रदेशचा विकास करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, यूपीमध्ये भाजप विजयाचा चौकार मारणार आहे. 2014 नंतर 2017, 2019 आणि आता 2022 ची पाळी आहे. यूपीच्या जनतेने कुटुंबवाद्यांना खाली पाडण्याचा निर्णय घेतला आहे. असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, कुटुंबवाद्यांचे कारनामे सर्व जनतेने पाहिले आहेत. यांना आता पुन्हा संधी मिळाली तर हे कहर करतील. सध्या हे कुटुंबवादी शेवटच्या घटका मोजत आहेत. हे लोक सूड उगवून बसले आहेत आणि त्यांना पुन्हा उभे राहू देऊ नये. यूपीतील भाजप सरकारमुळे आता भीतीचे वातावरण दूर होत आहे. आता धाक दाखवणारे थरथर कापत आहेत. असे मोदी म्हणाले.