बीड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Feb :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला आहे. गोरेगावमधल्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळण्याची घटना घडली आहे. राज ठाकरे यांना कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नसून, ते सुखरुप आहेत. आज शिवजयंती आणि शाखेचे उद्घाटन करण्यासाठी ते गेले होते. त्यादरम्यान कार्यक्रम सुरू अचानक स्टेज कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. स्टेजवर गर्दी जास्त झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे.

गोरेगावमध्ये आज मनसेचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. याच दरम्यान स्टेजवर अनेक मनसैनिकांनी गर्दी केली होती. स्टेजची क्षमता कमी असल्याने हा स्टेज अचानक खाली कोसळला. त्यात राज ठाकरे देखील खाली पडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेदरम्यान पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली असून, स्टेज कोसळल्याचा राग पत्रकारांवर काढण्यात आला आहे. राज ठाकरे सुखरुप असून, ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.