News

किल्लेधारुर करांची धकधक वाढली ; चाळीस अहवालांची आज प्रतिक्षा !

किल्लेधारुर(प्रतिनिधी) किल्लेधारुर शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्या रुग्णाच्या संपर्कातील ४० व्यक्तींचे स्वॅब मंगळवारी (दि.२) तपासणीसाठी स्व.विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज संध्याकाळी येणार असून यामुळे मात्र शहरवासियांची धकधक वाढली असून अहवाल कसा येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

किल्लेधारुर शहरात औरंगाबादहून प्रवास करुन आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५३ जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले होते. यांपैकी ४० जणांचे  स्वॅब मंगळवारी (दि.२) आरोग्य विभागाच्या वतीने तपासणीसाठी स्व.विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये केज येथील उपजिल्हा रुग्णालयातून २२ तर स्वा.रा.ती. अंबाजोगाई येथून १८ अहवाल पाठविण्यात आले आहेत. या  स्वॅबचे अहवाल आज बुधवारी रात्री आठ नंतर येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अहवाल निगेटीव्ह येणार कि पॉझिटीव्ह हाच एक विषय शहरात चर्चिला जात आहे. या अहवालाच्या प्रतिक्षेत मात्र शहरवासियांची धकधक वाढली असून सर्वांनाच अहवालाची प्रतिक्षा लागून आहे.