शिवजयंती निमित्त बीड शहरात ऐतिहासिक भव्य लेझर शो
12 Feb :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 व्या जयंती निमित्त शनिवार दि.19 फेब्रुवारी रोजी शहरात भव्य रांगोळी स्पर्धा, जिल्हास्तरीय भव्य इन्स्टाग्राम रील स्पर्धा, ऐतिहासिक भव्य लेझर शो चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते डॉ.योेगेश क्षीरसागर यांनी केले आहे.
भव्य जिल्हास्तरीय इन्स्टाग्राम रील स्पर्धेचा विषय शिवाजी महारांजांची चरित्र गाथा, पोवाडा, मर्दानी खेळ, शिवकालीन वेशभूषा हे असून सदर स्पर्धा पंधरा सेकंद ते 60 सेकंद (इन्स्टा रील किंवा व्हिडीओ असावा) सदर व्हिडीओ / रील @yogeshkshirsagar_ टॅग करणे अनिवार्य आहे. कंटेंट सोबत #shivjanmotsav2022#yogeshkshirsagar हे हॅसटॅग टाकणे अनिवार्य आहे.
सदर व्हिडीओ 10 ते 15 जणांना शेअर करावा. कोणतीही वयोमर्यादा नाही. स्पर्धेची अंतिक ता.19 फेंब्रुवारी रात्री 9.00 पर्यंत आहे. या स्पर्धेत 25 हजार रुपयांची रोख पारितोषीके ठेवण्यात आली असून अधिक माहितीसाठी 9260474747 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.00 पासून ऐतिहासिक भव्य लेझर शो चे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा इतिहास उजळणार आहे.
शिवजयंंती निमित्त भव्य रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून स्पर्धेचे विषय राजमुद्रा व गडकिल्ले असून या स्पर्धेत प्रथम पारितोषीक 11000/- रूपये, द्वितीय 7000/- रूपये, तृतीय 5000/- असे बक्षीस ठेवले असून स्पर्धकांनी रांगोळी आपल्या दारामध्ये काढायची आहे, रांगोळीच्या खाली आपले पूर्ण नाव व मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य आहे. रांगोळी ही 19 फेब्रुवारी रोजी सकाळी काढून दुपारी 2.00 वाजेपर्यंत सदर रांगोळीचे फोटो 9260474747 / 9271474747 या क्रमांकावर पाठवणे अनिवार्य आहे. शिवजयंती निमित्त आयोजीत केलेल्या सदर स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.