बीड

धावत्या गाडीत तरुणीवर बलात्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 Feb :- धावत्या रेल्वेगाडीत एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरील पीडित तरुणी जुन्या दिल्लीतील रहिवासी आहे. संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. पीडित तरुणी 9 फेब्रुवारीला दिल्लीहून मुंबईला आली होती. तेथे काही जणांनी तिला मुंबई शहर वाईट असून, येथे मुलींची विक्री केली जाते अशी भीती दाखवली होती.

मुंबईतल्या कथित गुन्हेगारीची भीती दाखवल्याने तरुणी घाबरली आणि पुन्हा मुंबईहून दिल्लीला जात होती. या प्रवासादरम्यान आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. सुरुवातीला तिला जनरल डब्यात जागा असून त्या ठिकाणी आराम कर असे सांगितले. त्यानंतर तिला पुन्हा रेल्वे पँट्रीजवळ पाठवले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने मदतीसाठी खूप आरडाओरड केली. परंतु, कुणालाही तिचा आवाज ऐकू आला नाही. त्यातच आरोपीने तिला मारहाण करत धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्याची धमकी दिली असे पीडितेने सांगितले.

पीडित तरुणीने आपल्या जबाबात म्हटल्याप्रमाणे, ती मूळची दिल्लीतील रहिवासी आहे. ती 9 फेब्रुवारीला दिल्लीहून मुंबईला आली होती. मात्र तेथे काही जणांनी तिला मुंबई खूप वाईट असून या ठिकाणी मुलींना देहविक्रयासाठी विकले जाते. तू परत जा असे सांगितले. यानंतर ती शुक्रवारी 11 फेब्रुवारीला दिल्लीला निघाली.

रेल्वेत गर्दी असल्याने तिला भुसावळला उतरावे लागले. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता तिने यशवंतपूर निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेसने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न केला. ती एसी डब्यात गेली होती. जागा मिळत नसल्याने ती खालीच अंथरुण टाकून झोपण्याचा प्रयत्न करत होती. या दरम्यान रात्री 8 वाजता एक माणूस आला. त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याने तिला उठवले आणि जनरल डब्यात जागा असल्याचे सांगितले. ती जाण्यास तयार नव्हती तरीही बळजबरी तिला त्या ठिकाणी पाठवले.

जनरल डब्यात आराम करत असताना पुन्हा आरोपी त्या मुलीकडे आला. तिला कँटीनच्या डब्यात घेऊन गेला. याच ठिकाणी तिला मारहाण करत आणि धावत्या रेल्वेतून फेकून देण्याच्या धमक्या देत बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने दुसऱ्या डब्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग दोन जणांना सांगितला. भोपाळमध्ये रेल्वे पोहोचताच तिने याबाबत तक्रार दाखल केली.