जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश; सोमवारपासून शाळांचे सर्व वर्ग सुरु
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 Feb :- राज्यात कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या नंतरही बीड जिल्ह्यात केवळ ८ विच्या पुढचे वर्गच सुरु करण्यात आले होते. मात्र आता जिल्ह्यातील पहिलीपासूनच्या सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व वर्गांच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधितांना सूचना देण्याची तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे मागच्या २ वर्षात शाळा सर्वाधिक काळ बंदच आहेत.
दुसरी लाट ओसरल्यानंतर दिवाळीच्या सुमारास काही काळ शाळा सुरु झाल्या होत्या, मात्र पुन्हा तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण वाढत असल्याचे सांगत शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र शाळा सुरु करण्यासाठी पालकांचाच दबाव वाढल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या, मात्र बीड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला केवळ ८ विच्या पुढील वर्ग सुरु करायला परवानगी दिली होती.
आता मात्र सोमवारपासून पहिलीपासूनच सर्व वर्ग सुरु होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व वर्ग सुरु करायला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून तसे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच शाळांची घंटा वाजणार आहे.