महाराष्ट्र

मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू यांना कारावासाची शिक्षा

11 Feb :- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू यांना महागात पडलं आहे. राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडून या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.