चाकूचा धाक दाखवून केला 58 वर्षीय महिलेवर बलात्कार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
10 Feb :- माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री अडीच वाजता पीडित 58 वर्षीय महिला घरी एकटीच होती. दोन आरोपींनी घराचा दरवाजा ठोठावला. पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. महिलेला चाकूचा धाक दाखवला. दोन्ही आरोपींनी महिलेवर बळजबरी बलात्कार केला. धमकी देऊन पळ काढला. महिला रात्रभर घाबरत घरात बसून राहिली.
मंगळवारी पीडितेने शेजार्यांना आपल्यावर घडलेली आपबिती सांगितली. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. अत्याचाराची घटना असल्यानं पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावून आला. पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी आणि विनिता साहूही घटनास्थळी पोहोचले.
वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिरापर्यंत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. यापूर्वीही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, त्यावेळी तक्रार करण्यात आली नव्हती. भीतीपोटी काही जण तक्रार करत नाहीत. त्यामुळं आरोपींची हिंमत आणखी वाढते. सदरील ही घटना आहे नाशिक येथील वाडी पोलीस हद्दतील.