बीड

‘या’ तारखेपासून CBSC-10वी, 12वीची परीक्षा होणार सुरू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Feb :- CBSE ने इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर विषयनिहाय तारीखपत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचा नमुना पेपरमध्ये दिल्याप्रमाणेच असेल. विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवरून नमुना पेपर डाउनलोड करू शकतात.

कोरोना महामारीमुळे CBSE 10वी-12वीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. डिसेंबरमध्ये पहिल्या टर्मच्या परीक्षा झाल्या. बोर्ड प्रथम टर्म परीक्षेचा निकाल जाहीर करेल, त्यानंतर टर्म-2 परीक्षेचे वेळापत्रक जारी केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पहिली टर्मची परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.