मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंनी हैराण होऊ नये-नवनीत राणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 Feb :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं बोलताना अनेकवेळा कौतुक केले आहे, त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावरून पुन्हा महाविकास आगाडीवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांना महाराष्ट्राचा सन्मान नसता तर पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग ही कामे झाली नसती. महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसं असतं तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता. सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मी त्यांचा आदर करतो पण त्यांनी मोदींच्या भाषणबाबत आहे हैराण होण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे. तसेच शरद पवार यांच्या कामाबाबत शंका नाही, जिथं राज्याचे मुख्यमंत्री घरात बसतात मात्र, दुसरीकडे या वयातही शरद पवार साहेब काम करतात त्यांचं मोदींनी कौतुक केलं ही कोणतीही चूक नाही, अशी कोपरखिळी त्यांनी मारली आहे.
सकाळीच संजय राऊतांनी जे सूचक विधान केलं त्यावरी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणतात मी सगळ्यांच्या बोलण्यबाबत ठेका घेतला नाही, पण महाविकास आघाडी मधील नातं तुटत चालल आहे. सध्या महाविकास आघाडीमधील कड्या कमजोर होत आहेत. असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही, त्यांच्यात समन्वय नाही अशी टीका अनेकदा भाजपकडून होत असते, मात्र नवनीत राणा यांच्या या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण आलंय. मोदींनी भाषण केलं, दिल्लीतल्या संसदेत मात्र त्यावरून महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार खडाखडी सुरू झाली आहे.