बीड

हिमस्खलनात 7 जवान दबले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Feb :- अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरच्या उंच भागात हिमस्खलन झाले आहे. येथे झालेल्या हिमस्खलनात किमान सात जवान त्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.हे सातही जवान एका गस्ती दलाचा भाग होते. भारतीय लष्कराने सोमवारी एक निवेदन जारी करून या जवानांचा शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचे म्हटले आहे. बचाव कार्यात विशेष पथकांना विमानाने पाठवण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. कामेंग भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरु आहे. यावेळीच हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील किमान 7 जवान अडकले असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने सांगितले की, सर्व जवान 6 फेब्रुवारीपासून तेथे अडकले आहेत.

अरुणाचल प्रदेश सामान्यतः पश्चिमेकडील कामेंग प्रदेश आणि उर्वरित भागात विभागलेला आहे. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडकडे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशसह 1,346 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) सुरक्षेची जबाबदारी आहे. या कमांडमध्ये तीन कॉर्प्स असतात. 33 कॉर्प्स सिक्कीममध्ये सुरक्षेसाठी जबाबदार आहेत.