शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत ‘किरीट सोमय्या’ पायऱ्यांवरुन कोसळले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 Feb :- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या धक्काबुक्कीदरम्यान सोमय्या हे पायऱ्यांवरुन कोसळले आहेत. त्यामुळे भाजपदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या हे सध्या पुणे दौऱ्यावर असून, पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. धक्काबुक्की झाल्याने सोमय्या यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोमय्या हे शिवसेनेने कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावत आहेत. यासंदर्भातील सोमय्या यांनी आज महानगरपालिकेत चौकशी केली. मात्र यावेळी पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला.
झटापटीत किरीट सोमय्या चक्क पायऱ्यांवर कोसळले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसवत गाडी पुढे नेली. यावेळी शिवसैनिकांनी गाडीलाही गराडा घातला होता. दरम्यान, या घटनेने पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.
सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या राऊतांविरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजी नगर पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी जात होते. नेमक याच वेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळेस हे कार्यकर्ते सोमय्या यांच्या अंगावरही धावून गेले. त्यामुळे प्रकरण आणखी वाढले अनेक प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला आहे.
गेल्या 5 वर्षांत एकाही प्रकल्पाचे नीट काम झाले नाही असे खोटे आरोप करण्यात आले. शिवसेनेवर केलेले खोटे आरोप खपवून घेणार नाही असाही इशारा यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना दिला आहे. भाजप नेत्यांकडून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. तर किरीट सोमय्या यांनी याबाबत सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.