बीड

गेवराई बंदला उत्सुर्फत प्रतिसाद

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Feb :- महाराष्ट्र राज्य सरकारने किराणा दुकान व अन्य मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे व्यापारी,महिला वर्ग,तसेच शालेय व महाविद्यालयीन तरुणासह किराणा दुकानावर साहित्य आणण्यासाठी जाणा-या वर्गातील लोकांना विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ येणार आहे.सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेर्धात व विरोध करण्यासाठी गेवराई शहरातील सर्व व्यापारी बांधवानी शुक्रवार ४ रोजी गेवराई बाजारपेठ बंद ठेऊन सहभागी झाले.या बंदला संपूर्ण शहरात उत्सुर्फत प्रतिसाद सकाळपासूनच मिळाला.जवळपास सर्वच व्यवहार व्यापा-यांनी बंद ठेवले होते.त्यामुळे ग्रामीण भागातून खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरिकांची अडचण निर्माण झाली होती.सर्व व्यापारी संघटनेने एकजुट दाखवत व शासनाचा निषेध करत आपले व्यवहार बंद ठेवून वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी करत होते.– कैलास हादगुले, गेवराई