जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणकर्त्या महिलेने दिला बाळाला जन्म
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 Feb :- शबरी योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊन देखील मावेजा मिळत नसल्याने, आदिवासी पारधी कुटुंबाचे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे. यातील एका महिलेची काल पहाटे प्रसूती झालीय. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. रुग्णालयात गेल्यानं उपोषण मोडेल आणि घर मिळणार नाही. या भीतीपोटी बाळांतीन महिलेसह कुटुंब उपोषण स्थळीच ठिय्या घालून बसले आहे. कडाक्याच्या थंडीत एक दिवसाच्या बाळाला घेऊन हे उपोषण सुरू आहे.