बीड

बीड शहरात क्लासेस चालकावर चाकूहल्ला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 Feb :- बीड शहरात क्लासेस चालकांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. युनिक अकादमी चे मालक हर्षल केकान यांच्यावर आचिवर्स क्लासेस च्या पंकज तांबारे यांनी चाकूहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. आजपर्यंत लातूर सारख्या जिल्ह्यात घडणारे क्लास वॉर आता बीड सारख्या शहरात सुरू झाल्याचे दिसत आहे.

बीड शहरातील उमा किरण कॉम्प्लेक्स मध्ये मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस चालतात. हजारो विद्यार्थी या ठिकाणी दहावी बारावी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे क्लास मध्ये शिकतात. या ठिकाणी बीडच्या स्थानिक प्राध्यापक इंजिनिअर यांच्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील बाहेरच्या राज्यातील लोक देखील क्लास चालवतात. आपल्या क्लास मध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावे यासाठी मोठमोठ्या ऑफर देखील दिल्या जातात. या प्रकारातूनच एका क्लास चालकाने दुसऱ्यावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

युनिक अकादमी चे संचालक हर्षल केकान यांच्यावर 20 जानेवारी रोजी याच भागात क्लास घेणारे आचिवर्स क्लासेस चे संचालक पंकज तांबारे आणि श्रीनिवास तंबारे या दोघांनी आमचे विद्यार्थी दुसऱ्या क्लास मध्ये का पाठवतो अस म्हणत धमकी दिली, त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता तांबारे यांनी चाकूने हल्ला केला. केकान हे फिजिक्स चे क्लास लावण्यासाठी विचारणा करणाऱ्या विदयार्थ्यांना दुसऱ्या क्लास मध्ये पाठवतात असा तांबारे यांचा आरोप आहे, त्यावरून त्यांनी हा सगळा प्रकार केला आहे.