बीड :- आज ३ रुग्ण कोरोनामुक्त
बीड मधील डॉक्टरांनी केलेले यशस्वी उपचार आणि नर्स,कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने बीडचा प्रवास आता कोरोनमुक्तीकडे सुरु झाला आहे.(दि.2) कुंडी (ता.धारुर), वडवणी व बीड शहर येथील प्रत्येकी 1 अशा तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंतच्या जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 56 इतकी होती. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 22 आहे, तर बरे झालेले 34 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे…
काळजी घ्या…स्वस्थ राहा…