मराठवाडा

भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू; 25 जखमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Jan :- जालना जिल्ह्यातील हातवण ता.मंठा येथे रविवारी दुपारी विवाह समारंभ आटोपून नाशिककडे व-हाडी मंडळीना घेऊन निघालेल्या आयशर टेम्पोला समोरुन माल वाहतूक करणा-या आयशर टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत व-हाडातील चौघे जण ठार झाले. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील शिवराई गावाजवळ सोमवारी पहाटे दीड वाजता घडला.

अपघातात व-हाडातील कविता आबासाहेब वडमारे वय 40, ललिता पुंडलिक पवार 45, प्रज्ञा गौतम गायकवाड 17, मोनु दिपक वाहुळे सर्व राहणार गौतम नगर अबंड औद्योगिक वसाहत परिसर नासिक असे मृतांची नावे आहेत. वाहन चालकासंह 22 जण जखमी झाले.त्यांच्यावर वैजापूर येथे सरकारी व खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आल्याची माहिती जखमीच्या नातेवाईकांनी दिली.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक निमीत गोयल यांनी सोमवारी सकाळी भेट दिली. या संदर्भात अधिक माहिती अशी की गौतमनगर अबंड जि. नाशिक येथील रहिवासी वैभव मोरे यांचा रविवारी ( दि. 30 ) रोजी मंठा तालुक्यातील हातवन जि. जालना येथील कांचन खरात यांच्या सोबत मंगल परिणय समारंभ पार पडला होता. आयशर टेम्पोतून व-हाडातील 30 ते 40 जण विवाह समारंभ आटोपून नाशिककडे रवाना होत असताना राष्ट्रीय महामार्गावरील शिवराई ता.वैजापूर येथे समोरुन आलेल्या मालवाहू आयशरची धडक बसली.

रात्रीच्या सुमारास अपघात घडल्याची महिती मिळाल्यानंतर वैजापूरचे आ. रमेश बोरनारे , उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, शिवराई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय आहेर, संजय बोरनारे,संजय घुगे यासह परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचा-यांनी युध्द पातळीवर मदत कार्य केले.

अपघातात जखमी झालेल्या 20 ते 25 जणांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वैजापूरचे उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यात दाखल केले.अपघातात दोन्ही अपघातात आयशर चालक गंभीररित्या जखमी झाले आहेत.यात एका चालकांचा पायाचा पंजा वेगळा तुटून पडला होता.अपघातात दोन्ही वाहनाचा जोरदार धडकमुळे मोठे नुकसान झाले.विवाह समारंभातील भेटवस्तूचा जोरदार धडकमुळे चुराडा झाला.