‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येईल- आरोग्यमंत्री राजेश टोपे
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
30 Jan :- देशभरासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटने देशभरात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान कोरोनाचा नवीन व्हेरिएंट न्यूकॉन व्हेरिएंटची भीती देखील वर्तवली जात आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी भाष्य केले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पंढरपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल. तसेच प्राथमिक माहितीनुसार कोरोनाचा न्यूकॉन हा व्हेरिंयट धोकायदायक आणि घातक असल्याचे बोलले जात आहे. मात्र या विषाणुचा सामना करण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटना यावर संशोधन करत आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्यात मृत्यूदर 30 टक्के असल्याचे बोलले जात आहे. तो ओमायक्रॉन एवढाच वेगाने पसरणारा आहे. मात्र अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटनेचा अभ्यास सुरु आहे. त्याचे कोणतेही बाधित नव्याने आढळलेले नाहीत. यामुळे सध्या याविषयी काळजी करण्याचे कारण नाही.’