विधानसभा निवडणुकीपूर्वी सपा, बसपा आणि काँग्रेसला मोठा झटका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
30 : Jan :- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपाला मोठा झटका बसला आहे. या तिन्ही पक्षातील 21 मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. बरेलीचे मौलाना तौकीर रजा यांची सुन निदा खान यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर निदा खान म्हणाल्या की, मुस्लिम महिला भाजपसोबत आहेत.
इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदचे प्रमुख मौलाना तौकीर रजा खान यांची सुन निदा खान यांनी रविवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी लखनऊमध्ये जाऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. निदा खान तीन तलास पीडित असल्याचे देखील बोलले जाते.
न्यूज एजेंसी एएनआयने दिलेल्या वृत्तानूसार, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निदा खान म्हणाल्या की, मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कारण भाजपने देशात ट्रिपल तलाक कायदा आणला आहे आणि सर्व धर्माच्या महिलांसाठी सशक्तिकरणाचे काम देखील भाजप करत आहेत. अशी प्रतिक्रिया निदा खान यांनी दिली आहे. निदा खान यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते शिवचरण प्रजापती, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत.