महाराष्ट्र

1 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये सुरू होणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Jan :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. पुण्यातील शाळा कधी सुरू होणार याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. पुण्यातील शाळा एक फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चार तास तर आठवीपासून पुढचे वर्ग पुर्ण तास भरणार आहेत. 15-18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस घेणे आवश्यक असून, शाळेतच लसीकरण केले जाणार आहे. पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क मुक्ती संदर्भात मंत्रिमंडळात कुठलीच चर्चा झाली नाही. ती बातमी चुकीची आहे.

आपल्याकडे मास्क लावणे अनिवार्य, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मागील तीन ते चार दिवसांपासून पुण्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या 1 फेब्रुवारीपासून पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत होती. आता पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने शाळा-महाविद्यालये सुरू होणार आहेत. मात्र, मास्क बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.