भारत

पंतप्रधान मोदी प्रचारासाठी यूपीला होणार रवाना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Jan :- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येत्या दहा फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी भाजपने आपली कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी तात्काळ प्रचारासाठी उत्तर प्रदेशाला रवाना होणार आहेत. 31 जानेवारीपासून नरेंद्र मोदी भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी यूपीत तळ ठोकून बसणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेत न जाता मोदी वर्च्युअल रॅलीद्वारे जनतेला संबोधणार आहेत.

31 जानेवारी रोजी मोदी आपली पहिली वर्च्युअल रॅली करणार आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील पाच जिल्ह्यात मोदी आपली पहिली रॅली करणार आहेत. त्यात सहारनपुर, बागपत, शामली, मुजफ्फरनगर आणि गौतम बुद्ध नगर या पाच जिल्ह्याचा समावेश असून, त्यात मोदी 21 विधानसभा मतदानसंघातील जनतेला संबोधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रसारण सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणार आहेत.

वर्च्युअल रॅलीसाठी भाजपच्या वतीने एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आलेले आहेत. एका एलईडीवर सुमारे 500 लोक मोदींचे भाषण ऐकू शकणार आहेत.देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 जानेवारीपर्यंत निवडणुकीची रॅली काढण्यास निवडणूक आयोगाने बंदी आणली होती. जर निवडणूक आयोगाने याचा कालावधी आणखी वाढवला तर, पंतप्रधान मोदी अशाच प्रकारे वर्च्युअल स्क्रीनद्वारे जनतेला संबोधित करणार आहेत.