भारत

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Jan :- केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विमान अपघातात शहीद झालेले CDS जनरल बिपिन रावत आणि दिवंगत भाजप नेते कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना कलेसाठी, राधेश्याम खेमका (मरणोत्तर), साहित्य आणि शिक्षणासाठी, जनरल बिपिन रावत यांना नागरी सेवेसाठी आणि कल्याण सिंह यांना लोक कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 128 जणांना सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 4 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

यांना मिळाले पद्मभूषण
गुलाम नबी आजाद – पब्लिक अफेयर्स,
विक्टर बनर्जी- आर्ट,
गुरमीत बावा (मरणोत्तर) – आर्ट,
बुद्धदेव भट्‌टाचार्य – पब्लिक अफेयर्स,
नटराजन चंद्रशेखरन – ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्री,
कृष्णा एल्ला आणि सुचित्रा एल्ला – ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्री,
मधुर जाफरी – पाक कला,
देवेंद्र झाझरिया – स्पोर्ट्स,
राशिद खान – आर्ट,
राजीव महर्षी – सिविल सर्विस,
सत्या नडेला – ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्री,
सुंदर पिचाई- ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्री,
सायरस पूनावाला – ट्रेड अ‍ॅ​​​​​​​ण्ड इंडस्ट्री,
संजय राजाराम (मरणोपरांत) – सायन्स अण्ड इंजीनियरिंग,
प्रतिभा रे – लिटरेचर अ‍ॅ​​​​​​​ण्ड एज्युकेशन,
स्वामी सचिदानंद- लिटरेचर अ‍ॅण्ड एज्युकेशन,
वशिष्ठ त्रिपाठी – लिटरेचर अ‍ॅण्ड एज्युकेशन,