मराठवाडा

मराठवड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस थंडीची तीव्र लाट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Jan :- राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस थंडी वाढणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता.

अवकाळीच्या पावसामुळे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा पुढील 48 तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यातील काही भागात थंडीची हीच स्थिती राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

या वर्षातील सर्वात किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहाटेसह दिवसभर थंडी जाणवत आहे. राज्यभरातील सर्वच थंड हवेच्या ठिकाणी बोचरी थंडी पडली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे महामुंबईतही थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने राज्यात गारवा अनुभवता येणार आहे.